भिवघरमध्ये महिलांसाठी स्वच्छता शिबीर

। महाड । प्रतिनिधी |
महाड तालुक्यांतील भिवघर येथे वनप्रेमी सामाजिक संस्था आणि वेदा शक्ती महाड यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामिण परिसरांतील महिलांना वैयक्तीक स्वच्छता शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यांत आले होते.या शिबीरा मध्ये महिलांना स्वच्छतेचे महत्व सांगताना वैयक्तीक स्वच्छता कश ाप्रकारे करावी याची सविस्तर महिती देण्यांत आली.
शिबिराला वन प्रेमी संस्थेचे अध्यक्ष किशोर पवार, रेश्मा राणे आदि मान्यवर उपस्थित होते.शिबिराला भिवघर पंचक्रोशीतील 60ते 70 महिला उपस्थित होत्या.यावेळी रेश्मा राणे यांनी महिलांच्या समस्या आणि त्या विषयी कोणती काळजी घ्यावी याची माहिती सांगितली.त्याच बरोबर प्रत्येक महिलेने आपल्या वैयक्तीक स्वच्छतेकडे काळजीपूर्वक पाहावे असे आवाहन केले.
अंगणवाडी सेविका संगीता गुडकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. उपस्थित महिलांना सॅनेटरी पॅडचे वाटप करण्ंयात आले.शिबीर यशस्वी होण्यासाठी डॉ.सायली तलवार, वैशाली भोसले,मंजुळा पवार,स्मिती कळंबे यांनी विषेश प्रयत्न केले.

Exit mobile version