वाईट वर्तनासाठी दिली मोठी शिक्षा
। मिरपूर । वृत्तसंस्था ।
पाकिस्तान आणि बांगलादेश दरम्यान खेळल्या जात असलेल्या टी-20 मालिकेत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीला मोठा झटका बसला आहे. पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात चमकदार कामगिरी करणार्या हसन अलीवर आयसीसी आचारसंहिता अंतर्गत स्तर-1 चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे, ज्या अंतर्गत त्याला 1 डिमेरिट पॉइंटचा दंड ठोठावण्यात आला आहे. हसन अलीने शिस्त मोडली, त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. हसन अलीशिवाय बांगलादेश संघालाही 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
खरे तर हे प्रकरण पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याचे आहे. पाकिस्तानसाठी 17 वे षटक टाकणार्या हसन अलीने बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज नुरुल हसनची विकेट घेतली आणि विचित्रपणे त्याला पॅव्हेलियनमध्ये जाण्यास सांगितले, ज्याला आयसीसीने अनुशासनहीन मानले आहे. तो स्तर-1 साठी दोषी आढळला आणि त्याला 1 डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. 24 महिन्यांतील हसन अलीची ही पहिली मोठी चूक आहे. भविष्यातही असेच वर्तन राहिल्यास त्याच्यावर मोठी कारवाई होऊ शकते.