माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने बघाल तर…!

महापौर किशोरी पेडणेकरांचे धमकीपत्राला उत्तर
या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल; कुटुंबियांसाठी पोलीस संरक्षणाची मागणी

। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार आणि किशोरी पेडणेकर यांच्या वादानंतर आता महापौरांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रात अश्‍लिल भाषेचा वापर करत महापौर पेडणेकर यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी या पत्रात देण्यात आली आहे. या प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर पोलिसांत तक्रार दाखल करणार असून कुटुंबियांसाठी पोलीस संरक्षणाची मागणी करणार आहेत.
गुरुवारी संध्याकाळी हे पत्र महापौर बंगल्यावर पोहचले होते. या पत्राद्वारे महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. टीव्ही 9च्या वृतानुसार “माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने बघू नका” अशा आशयाचे पत्र महापौर यांना पाठवण्यात आले आहे. पनवेलमधून कुरियरद्वारे हे पत्र पाठवण्यात आले आहे. पत्रावर आणि पत्राच्या मजकुराखाली दोन वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. तसेच यामध्ये खारघर, पनवेल आणि उरण या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Exit mobile version