गावठी दारुचा अड्डा उद्ध्वस्त

रसायनी पोलिसांची धडक कारवाई
रसायनी | वार्ताहर |
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशिवली ठाकुर वाडीतील डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारुची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलिसांनी शिताफीने छापा टाकून गैरकायदा गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला.
यावेळी वाशिवली ठाकुर वाडीतील काळूराम अंबो भुरवडे यांनी गैरफायदा गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याचे साहित्य व रसायन तसेच गावठी हातभट्टीची तयार दारु असे एकूण मिळून 86770 रुपये किंमतीचा माल मिळून आला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धनाजी काळे, पोलिस हवालदार अमित कवले,नंदन पाटील, जयवंत बैकर,आतिष गायकवाड यांनी कारवाई केली. याप्रकरणी रसायनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version