महाडमध्ये बेकायदेशीर कोळसा जप्त; एकावर गुन्हा दाखल

। महाड । वार्ताहर ।
महाड तालुक्यातील किल्ले रायगड परिसरात बेकायदेशीर लाकडी कोळसा पाडणाऱ्यांवर वनविभागाने कारवाई केली असून कोळशाची ८४ पोती जप्त केली. तर एक जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महाड वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार उप वनरक्षक रोहा तसेच सहा. वनरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली दि ७ मार्च रोजी महाड वनविभागाचे वनपरिक्षेत्र आर बी साहू यांनी रायगड किल्याच्या पायथ्याशी असलेल्या मौजे वरंडोली या गावाजवळच्या जंगलामध्ये अवैध वृक्षतोड करुन लाकडी जळाऊ कोळसा वाढला जात असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीवरून महाड वन विभागाने धडक कारवाई केली. या मध्ये कोळशाच्या ८४ पोती जप्त करण्यात आल्या. तसेच अनिल चव्हाण याला ताब्यात घेण्यात येऊन त्याच्या विरोधात महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम १९६४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version