। पनवेल । वार्ताहर ।
मूळचा छत्तीसगड येथील राहणारा प्रकाश जोधो सागर यास बेलापूर गावातून बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतूस सह पनवेल गुन्हे शाखा कक्ष-2 यांच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे. प्रकाश जाधो सागर हा गंभीर गुन्हा करण्याच्या हेतूने बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगत असल्याची माहिती पो.उप.निरि. रोंगे यांना मिळाली त्यानुसार बेलापूर परिसरात सापळा लावून तब्यात घेतले असता त्याच्या तब्यात एक देशी बनवटीचे पिस्तूल व एक 9ाा चे जिवंत काडतूस मिळून आले आहे.
बेकायदेशीर पिस्तूल बाळगणार्यास अटक
