गुटख्याची अवैध विक्री

| श्रीवर्धन । वार्ताहर ।

मागील अनेक दिवसांपासून श्रीवर्धन शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये अवैध गुटख्याची विक्री बिनदिक्कत पणे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. विमल नावाच्या पान मसाला तथा गुटख्याची विक्री संपूर्ण तालुक्यामध्ये जोरदारपणे सुरू आहे. रुपये पंधरा पासून, तीस रुपयापर्यंत गुटख्याची पाकीटे सर्रासपणे पान टपर्‍यांपासून सर्वच दुकानांवरती विकली जात असल्याचे पाहायला मिळते. या धंद्यामध्ये अवैध गुटख्याची विक्री करणारे व्यापारी लाखो रुपयांचा मलिदा कमवत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र शासनाने गुटख्यावरती बंदी आणलेली असताना संपूर्ण तालुक्यात गुटखा कोणत्या ठिकाणाहून उपलब्ध होतो. याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. याबाबत शहरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष वेश्‍विकर यांनी लेखी तक्रार करुन सुध्दा अवैध गुटखा विक्री सुरू आहे. मात्र जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन त्याप्रमाणे स्थानिक पोलीस या गोष्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Exit mobile version