| पनवेल | वार्ताहर |
प्रमाणापेक्षा जास्त शेळ्या-मेंढ्या ट्रकमध्ये भरून त्यांना क्रूरपणे वागणूक देऊन त्यांच्या अन्नपाण्याची व प्रथमोपचारची व्यवस्था न करता अवैध वाहतूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
खारघर पोलीस ठाणे हद्दीतून लेलँड ट्रक क्रमांक जीजे 01 एचटी 6133 आणि जीजे 01 केटी 8393 मधून बकर्यांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हिरानंदनी ब्रिज येथे दोन्ही वाहनांची तपासणी केली. आतमध्ये बकरे आणि मेंढ्या आढळून आल्या. त्यांच्या वाहतुकीबाबत, परवानाबाबत विचारले असता त्यांनी कोणताही परवाना नसल्याचे सांगितले व बकरे व मेंढ्या अहमदाबाद गुजरात येथून खरेदी करून कर्नाटक येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. खरेदीबाबत त्यांनी कोणतेही कागदपत्रे सादर केली नाहीत. फारूक मोहम्मद शेख (रा. गुजरात), भूमा ओंकार राम (रा. राजस्थान) याच्याकडील दोन ट्रकमध्ये प्रमाणापेक्षा जास्त मेंढ्या भरून त्यांना क्रूरपणे वागणूक देऊन त्यांची अन्नपाण्याची व प्रथमोपचाराची व्यवस्था केली नाही. दोन्ही ट्रकमधून 310 शेळ्या-मेंढ्यांची डांबून, कोंबून भरून अवैध वाहतूक करत असताना मिळून आल्याने दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.