महत्वाची बातमी! अलिबाग- रोहा मार्गावरील वाहतूक बंद

| अलिबाग | प्रतिनिधी |
गेल्या आठवड्यापासून अलिबाग तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. जिल्ह्यातील अनेक वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुरुवारी पहाटेपासून सुरु असलेल्या पावसाने बोरघर-उमटे मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्यावर पाणी आले आहे. उमटे ते बोरघर रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे रोहाकडे जाणारी वाहतूक बंद केली आहे. अलिबाग मधून सुटणारी एसटीबस सकाळी नऊ वाजल्यापासून वावे पर्यंतच पाठवली जात आहे. अलिबाग आगारातील रोहा कडून येणारी एसटी बस उमटे येथे अडकून असल्याची माहिती एसटी बस आगार व्यवस्थापक अजय वनारसे यांनी दिली.

Exit mobile version