| लाहोर | वृत्तसंस्था |
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देशाच्या स्वातंत्र्यदिनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. पण आश्चर्य म्हणजे या व्हिडिओमध्ये पाकिस्तानला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या संघाच्या कर्णधाराचा उल्लेखही करण्यात आलेला नाही. देशाचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना स्वातंत्र्यदिनी देशातील महान क्रिकेटपटू आणि त्यांच्या कामगिरीवरील व्हिडिओमध्ये समाविष्ट करण्यात आले नाही. इमरान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 1992 मध्ये विश्वचषक जिंकला होता. इमरान यांच्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल लोकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानच्या तहरीक-ए-इन्साफ पार्टीचे (पीटीआय) संस्थापक इमरान 5 ऑगस्टपासून पंजाब प्रांतातील अटॉक तुरुंगात बंद आहे. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात त्यांना तीन वर्षांची शिक्षा झाली आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने त्यांना पुढील पाच वर्षांसाठी राजकारणातून अपात्र ठरवले आहे. इमरान यांना तुरुंगात वाईट परिस्थितीत ठेवण्यात आल्याची तक्रार पीटीआयने केली आहे.
पीसीबीने 14 ऑगस्ट रोजी दोन मिनिटे 20 सेकंदाचा व्हिडिओ जारी केला, ज्यामध्ये इमरान कुठेही दिसत नाहीत. 1992 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या पाकिस्तानी संघाचा ते कर्णधार होतो. इमरान पाकिस्तानमध्ये इतके लोकप्रिय आहेत की पीसीबीच्या या हालचालीवर पाकिस्तानमध्ये ट्विटरवर मशेम ऑन पीसीबीफ ट्रेंड होऊ लागला.
जिब्रानच्या एका चाहत्याने लिहिले की, पीसीबीचे सध्याचे प्रशासक जन्मालाही आले नव्हते जेव्हा इमरान देशाचा गौरव करत होते. पीसीबीने जे केले ते लज्जास्पद आहे. दिग्गज इमरान खान हृदयावर राज्य करतात आणि या कृत्यासाठी तुम्हाला नेहमीच शाप मिळेल.