। माणगाव । सलीम शेख ।
माणगावपासून १५ किमी अंतरावर असणाऱ्या घोटवळ गाव फाट्याजवळ मुंबई-गोवा महामार्गावर होंडा एक्सेडची दुचाकीला(मोटार सायकलला) धडक लागून झालेल्या अपघातात मोटार सायकलस्वार जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सदरचा अपघात मंगळवार दि.१३ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २:१५ वाजण्याच्या सुमारास घडली.या अपघाताच्या गुन्ह्याची फिर्याद हर्षल संजीवन देवकर (वय-२६) रा.पुगाव ता.रोहा यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,यांतील आरोपी अज्ञात चालक हा त्याच्या ताब्यातील फोर व्हीलर होंडा एक्सेड गाडी नंबर एम.एच.०४ एच.एन.९९८९ हि गाडी मुंबई – गोवा महामार्गावरून मुंबई बाजूकडून माणगाव बाजूकडे स्वतः चालवीत घेऊन जात असताना अपघात ठिकाणी आल्यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वेगाने वाहन चालवून मोटार सायकल क्रमांक एम.एच.०६ सीजी २४२४ या गाडीला धडक दिली.या अपघातात मोटार सायकलस्वार अतिश चंद्रकांत म्हस्के रा.भुवन ता.माणगाव हा जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.२६३/२०२२ भादवि संहिता कलम २७९,३३७,३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४ ,१३४ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे.सदर अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री.तुणतुणे हे करीत आहेत.