| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड पोलिस दलातील कर्मचाऱ्याने आपल्या पोलिस कर्मचारी निवासस्थानात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
राजू पाटील असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
सदर पोलिस कर्मचारी पोलिस निवासस्थानात तात्पुरत्या स्वरूपात राहत होता. आज दुपारच्या सुमारास त्याने विष प्राशन केले. ही माहिती कळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी इतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात पोलिस कर्मचारी राजू पाटील याला दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.