मुंबईत शिंदे, ठाकरे गटात राडा

सदा सरवणकर यांचा गोळीबार; पोलिसात गुन्हा दाखल
| मुंबई | प्रतिनिधी |

गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती. या बाचाबाची हाणामारीत झालं शनिवारी मध्यरात्री दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला. या प्रकारानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना नेते सुनील शिंदे यांनी केला आहे.

या आरोपानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पोलीस स्टेशन परिसरात आपण कोणताच गोळीबार केलेला नाही, कोणताही गुन्हा केलेला नाही. जाणीवपूर्वक बदनाम करण्याची ही रणनीती असल्याचा आरोप सदा सरवणकर यांनी केला आहे. दादरमध्ये झालेल्या राड्यानंतर सरवणकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतही सरवणकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, पोलिसांवर दबाव आणून कुणी गुन्हा दाखल केला असेल तर पोलीस त्याचा तपास करतील असेही सरवणकर यांनी स्पष्ट केले आहे. या भागातील आमदार असल्याने हा सगळा बदनामीचा प्रकार असल्याचा त्यांनी सांगितले. आपण कामातून मोठे झालेलो आहोत, भांडणे करुन मोठे झालेले नाही. भविष्यात असे वाद करु नयेत, याची काळजी घ्यायला हवी. पोलिसांना मदत करण्यासाठी, त्यांनी चौकशीला बोलावले तर जाऊ असेही ते म्हणाले.

पोस्टर फाडून, दगडफेक करुन माझे काम संपवता येणार नाही, असेही सरवणकर यांनी म्हटले आहे. यामागे बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केले आहे. अशा प्रकारचा उद्रेक करण्यापेक्षा एकमेकांना कामाने जिंकू, असा सल्लाही त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना दिला आहे. मात्र, अद्याप या प्रकाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत चर्चा झाली नसल्याची माहिती सरवणकरांनी दिली आहे.

याप्रकरणात दादर पोलिसांनी 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केल तर महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना अटक केली होती. याविरोधात शिवसेना अ‍ॅक्शन मोडमध्ये आली होती. रविवारी सकाळपासून दादर पोलीस ठाण्यात शिवसेनेचे खासदार अरविंद ,माजी महापौर किशोरी पेडणेकर, अनिल परब आणि अंबादास दानवेही हे देखील पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात केलेल्या कारवाईचा तीव्र निषेध केला.

Exit mobile version