मुरुड तालुक्यात 409 उमेदवारी अर्ज वैध, तर 5 अर्ज बाद

| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील 15 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीकरिता 160 जागांसाठी 414 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी झालेल्या छाननीमध्ये 5 उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले, तर 409 उमेदवारी अर्ज वैध ठरले. सरपंच पदाकरीता 55, तर ग्रामपंचायत सदस्यपदाकरिता 354 उमेदवार निवडणूकीत उभे असुन येत्या 25 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे.

एकदरा ग्रामपंचायत : 9 ग्रामपंचायत सदस्य पदाकरीता 8 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये एका सदस्याचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला.

मांडला ग्रामपंचायत : 9 ग्रामपंचायत सदस्य पदाकरीता 21 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला.

चोरढे ग्रामपंचायत : 9 ग्रामपंचायत सदस्य पदाकरीता 19 सदस्यपदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल झाले. एका सदस्याचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला.

बोर्ली ग्रामपंचायत : 11 ग्रामपंचायत सदस्य पदाकरीता 49 उमेदवारी अर्ज दाखल झाले होत. एका सदस्याचा उमेदवारी अर्ज बाद झाला.

नांदगाव ग्रामपंचायत : 11 ग्रामपंचायत सदस्यपदाकरिता 40 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. एका सदस्याचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला.

Exit mobile version