| पनवेल | प्रतिनिधी |
मंदार काणे इंटरटेनमेंट आणि प्रिया इव्हेंट्स प्रस्तुत खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या पत्नी ममता म्हात्रे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते प्रथम क्रमांक पटकविणार्या मिरा मालगुडकर यांना पैठणी देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री बिग बॉस फेम मा. मिरा जगन्नाथ, पनवेल अर्बन बँक संचालिका माधुरी गोसावी, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकार, नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, मा.नगरसेविका सुलोचना कल्याणकर व इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेच्या विजेत्या मिरा मालगुडकर (पहिला क्रमांक), स्नेहल शेट्टे (दुसरा क्रमांक), रेश्मा कोकरे (तिसरा क्रमांक), वर्षा ठाकरे (चौथा क्रमांक), कीर्ती कुलकर्णी (पाचवा क्रमांक) यांचे ममता म्हात्रे यांनी अभिनंदन केले.