हाशिवरे येथील बेपत्ता तरुणाच्या शोधात

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथील 25 वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून पोयनाड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

प्रथमेश गणेश मोकल असे या तरुणाचे नाव आहे. हा 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घरात कोणालाही काही न सांगता घरातून बाहेर गेला. रात्र होत आली, तरीही तो घरी आला नाही. त्यामुळे त्याचा नातेवाईकांनी शोध घेतला. तरी तो सापडला नाही. याप्रकरणी 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोयनाड पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक पी. सी. पाटील करीत आहेत.

प्रथमेश याची उंची 150 सें.मी. अंगाने सडपातळ, चेहरा उभा असून त्याने अंगात राखाडी रंगाचा हाफ टी शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातली आहे. वेगवेगळ्या माध्यमातून या तरुणाचा शोध पोलीस घेत आहे. सोशल मिडीयासह सायबर गुन्हेशाखेच्या मदतीने त्याचा शोध युध्द पातळीवर सुरु करण्यात आला आहे.

Exit mobile version