सुधागडात दोन तरुणांना झाडाला बांधून चोपले

व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ
पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यात एका सार्वजनिक कार्यक्रमास आलेल्या दोन तरुणांना चिंचेच्या झाडाला दोराने बांधून बेदम चोप देण्यात आलाय. या मानवतेला काळिमा फासणार्‍या अमानवी घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीत सदरचा व्हिडीओ चिवे सुधागड आदिवासी वाडी येथील असल्याचे समोर आलेय. तर ज्या दोन तरुणांना झाडाला बांधून शिक्षा देण्यात आली ते तरुण सुधागड तालुक्यातील सिद्धेश्‍वर आदिवासींवाडी येथील असल्याचे बोलले जातेय.
सदरचा प्रकार हा अत्यंत घृणास्पद व निंदनीय असून या घटनेची प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, जेणेकरून पुन्हा असे कृत्य करण्याची कुणाची हिम्मत होणार नाही. अशी मागणी आदिवासी विकास परिषदेचे कोकण संघटक रमेश पवार यांनी केली आहे.

ज्या तरुणांना मारहाण झाली आहे त्या तरुणांनी कोणतेही भय न ठेवता पोलीस स्थानकात तक्रार दिल्यास त्या दृष्टीने तपास करता येईल, व दोषी आढळणार्‍या व्यक्तींवर कारवाई करता येईल.
विजय तायडे, पोलीस निरीक्षक

Exit mobile version