विद्यार्थ्यांना मिळणार गुण
। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यात बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली आणि बोर्डाकडून परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपरमध्ये प्रश्न विचारण्यात चुक झाली. परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये एक गुणांच्या प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला, त्यामुळे प्रश्न सोडविताना विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. परंतु पेपर झाल्यानंतर दुसर्या दिवशी बोर्डाच्या लक्षात ही चुक आली आणि हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांचा एक गुण देण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले.
पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांशी, शिक्षकांची चर्चा केली. त्याबाबत बोर्डाला देखील कळविण्यात आले. त्यानुसार बोर्डाने संबंधित प्रश्न सोडविणार्या विद्यार्थ्यांना एक गुण देण्याचा निर्णय घेतला.