पेण नगरपालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती

। पेण । वार्ताहर ।
पेण नगरपालिकेची मुदत नुकतीच संपली असून नगरपालिकेच्या निवडणूका लांबणीवर पडलेल्या आहेत. 31 डिसेंबर 2021 रोजी विद्यमान लोकप्रतिनिधींची नगरसेवकांची मुदत संपली असून या पार्श्‍वभूमीवर पेण नगरपालिकेचे प्रशासक म्हणून पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जिवन पाटील यांची नगरपालिकेचे प्रशासक म्हणून नेमणूक झाली आहे. सोमवारपासूनच पेण नगरपालिकेतील लोकप्रतिनिधींच्या केबिनला नियमानुसार सिल लावण्यात येईल. याचाच अर्थ विद्यमान सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक हे आपल्या कार्यकाळातून मुक्त झालेले आहेत. या पुढे निवडणूका होत नाहीत तो पर्यत पेण नगरपालिकेचा सर्व कारभार प्रशासक जिवन पाटील पाहणार आहेत. दरम्याने सोमवारी विरोधी पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी नगरपालिकेत जाउन प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळणार्‍या जिवन पाटलांचा पुष्पगुच्छ देउन स्वागत केले.

Exit mobile version