आंबेवाडी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेचे लोकार्पण

। रोहा-कोलाड । वार्ताहर ।
रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी येथे गुरुवार दि.19 ऑगस्ट रोजी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला.यावेळी जि.प.सदस्य दयानंद पवार,प.स.सदस्य सिद्धी राजीवले, प्रितम पाटील,सुरेश महाबले,श्रीकांत चव्हाण,राकेश शिंदे,जयवंत मुंडे, विशाखा राजीवले वरसगाव ,कुमार लोखंडे, कांचन वाचकवडे, जगन्नाथ धनावडे, अविनाश पलंगे, गणेश वाचकवडे, ससाणे डॉ.वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, व कर्मचारी उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रायगड जिल्हा परिषद अंतर्गत 14 व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रक्कमेतून रायगड जिल्ह्यात सुसज्ज अशा 15 रूग्णवाहीका उपलब्ध करण्यात आल्या असून आंबेवाडी आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पालकमंत्री तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला .

Exit mobile version