श्रीवर्धन | वार्ताहर |
पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते श्रीवर्धन तालुक्यातील मेघरे ग्रामपंचायत कार्यालयाच्या कामाचे भूमीपूजन व प्राथमिक आरोग्य केंद्र वाळवटी येथे 102 अॅम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की, कोरोनाचे संकट अजून गेलेले नाही, कोरोना रोगापासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र वाळवटीला अॅम्ब्युलन्सचे लोकार्पण करताना आणि इमारतीच्या दुरुस्तीसाठी 15 लाखाचा निधी उपलब्ध केला याचे समाधान असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यासमवेत महंमद मेमन, तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, उपाध्यक्ष सूचिन किर, जिप सदस्या प्रगती अदावडे, पं.स. सदस्य मंगेश कोमनाक, हरेश्वर सरपंच अमित खोत, तहसीलदार सचिन गोसावी, गटविकास अधिकारी उद्धव होळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पांडे, सर्व शासकीय विभागाचे अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते .