अमृतवेल पतसंस्थेचे उद्घाटन

। चौक । वार्ताहर ।

चौक बाजारातील कोल्हापूर पेठ येथील इस्माईल अपार्टमेंट येथे अमृतवेल नागरी सहकारी पतसंस्था शाखेचे नवीन जागेत उद्घाटन प्रभाकर सालेकर तसेच सरनोबत नेताजी पालकर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हर्षल हनुमंते यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर गणेश पूजन करून पतसंस्थेच्या दैनंदिन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक हिंगे, संचालक राजेंद्र नवले, रमेश शिंदे, दत्तात्रय जेजुरकर, महाव्यवस्थापक सुजय कुठे, शशिकांत मालुसरे, अजित शेख, नंदू घरत आदी उपस्थित होते.

Exit mobile version