| नागोठणे | वार्ताहर |
पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीतील वेलशेत व आंबेघरमधील नागरिकांच्या लोकवर्गणीतून व पिगोंडे ग्रामपंचायतीच्या सहकार्यांने प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीमधील आकर्षक तटबंदी असलेल्या शिवस्मारकाचे लोकार्पण पिगोंडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष जनार्दन कोळी यांच्या हस्ते मंगळवारी (दि.30) करण्यात आले. यावेळी महाराजांची मूर्ती घडविणारे हमरापूर (पेण) येथील मूर्तीकार लहू ठाकूर व अन्य मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या संपूर्ण सोहळ्याचे सुत्रसंचालन पुंडलिक ताडकर व संतोष ताडकर यांनी केले.
या सोहळ्यास शैलेश शेलार, सखाराम घासे, नाना बडे, धनाजी पारंगे, कांचन माळी, रंजना तुषार माळी, कुसुम बावकर, नेत्रा पारंगे, गीता पाटील, प्रशांत बडे, विजय अहिरे, सुधाकर पारंगे, काळुराम माळी, बळीराम बडे, मारुती पारंगे, यादव माळी, नथुराम घासे, गंगाराम मिणमिणे, राजेंद्र ताडकर, राजेंद्र लवटे, पंढरीनाथ घासे, विजय पारंगे, अंकुश ताडकर, रामचंद्र घासे, रोशन पारंगे, चंद्रकांत कोळी, नंदकुमार कोळी, मोहन बडे, मनोहर माळी, गंगाराम पारंगे, सुभाष मढवी, प्रल्हाद पारंगे, जनार्दन घासे, नामदेव घासे, गोरखनाथ पारंगे, वसंत घासे, हिराचंद बडे, हरिश्चंद्र घासे, शैला बडे, शिवसंस्कार ग्रुपचे सर्व सदस्य आदींसह पिगोंडे, वेलशेत व आंबेघर मधील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.