। महाड । प्रतिनिधी ।
रायगडमध्ये पुन्हा एकदा एसटी बसचा भीषण अपघात झाला. रायगडच्या वरंध घाटात एसटी बस 50 फूट खोल अडकून पडली. या अपघातात 18 प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली. तसेच मुंबईमधील प्रवाशांनी घरी पोहोचविण्याची व्यवस्था देखील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
रायगडच्या वरंध घाटात एसटी बसला भीषण अपघात झाला. बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वरंध घाटात अवघड वळणावर बस सुमारे 50 फूट खाली कोसळली.
अपघातग्रस्त बस सुनेभाऊ या गावातून महाडकडे येत होती. अपघात काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातात 18 प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींवर महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचार करण्यात आले. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.