संविधान कट्ट्याचे उद्घाटन

| पनवेल | प्रतिनिधी |

स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने खांदा कॉलनी येथे संविधान कट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संविधान पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. यावेळी संविधान स्वातंत्र्य मार्चचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यभरातून संविधान प्रचारक सहभागी झाले होते.

संविधान कट्टा उभारून ते सातत्यपूर्ण संविधान साक्षर नागरिक घडविण्याचे काम करतील, अशी प्रतिक्रिया संविधान प्रचारक नागेश जाधव यांनी दिली. तर, मंडळाचे अध्यक्ष महेद्र कांबळे यांनी संविधान प्रचारकांचे आभार मानले.

संविधान कट्टा उभारण्याची प्रेरणा एस.एम. जोशी फाउंडेशनच्या सुभाष वारे यांच्याकडून मिळाली, अशी प्रतिक्रिया संविधान प्रचारक प्रवीण जठार यांनी दिली. यावेळी पनवेल महानगपालिकेच्या उपमहपौर सीता पाटील, माजी नरसेवक गणेश पाटील, डॉ. सपकाळ, मारुती शेरकर, शोभा कांबळे आणि संविधान प्रचारक संदीप आखाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version