निवळी येथे विकासकामांचे उद्घाटन

। चिपळूण । प्रतिनिधी ।
जि.प. सदस्या तथा जिल्हा नियोजन कमिटीच्या सदस्या निकिता सुर्वे यांच्या नियोजन फंडातून निवळी गावात विविध विकासकामे पूर्णत्वाला गेली. त्यामध्ये रस्ते, पूल, काजवे, स्मशानशेड, मोरी इत्यादींचा समावेश आहे. यामधील निवळी लाखणवाडी येथील स्मशानशेडचे उद्घाटन जि.प. सदस्या निकिता सुर्वे आणि कुंभारवाडी येथील काजवेचे उद्घाटन बबन लोकरे तसेच लाखणवाडी ते कुंभारवाडी रस्त्याचे भूमीपूजन स्थानिक पदाधिकारी यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.
आणखी इतर पूर्ण झालेल्या विकासकामांचा शुभारंभ तसेच नव्याने हाती घेतलेल्या विकासकामांचे भूमीपूजन निवळी येथे विविध मान्यवरांच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी जि.प. सदस्या निकिता सुर्वे, शरद शिगवण-माजी उपसभापती पं.स. चिपळूण, मनोज डिके-उपसरपंच निवळी, रवींद्र सुर्वे-सदस्य, चिपळूण तालुका शिक्षण कमिटी, बबन लोकरे-माजी सरपंच, अरविंद रेपाळ-उद्योजक, अविनाश मोहिते-ग्रा.पं. सदस्य, कॉन्ट्रक्टर राजेश चंद्रकांत सुर्वे, सुयोग सुर्वे इत्यादींचा समावेश

Exit mobile version