वडगाव येथे गणेशघाटाचे उद्घाटन

| रसायनी | वार्ताहर |
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वडगाव जिल्हा परिषद विभागातील इसांबे आणि तांबाटी येथे जि.प. सदस्या पद्मा पाटील यांच्या जिल्हा परिषद सेस फंडातून प्रत्येकी सहा लाख रुपये निधीतून गणेशघाट बांधण्यात आले आहेत. या गणेशघाटांचे उद्घाटन पद्मा पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून करण्यात आले.

इसांबे आणि तांबाटी गावात गणेश विसर्जन करण्यासाठी घाट नसल्याने ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. जि.प. सदस्या पद्मा पाटील यांच्या प्रयत्नांतून गणेश घाट बांधून ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करण्यात आल्याने त्यांना धन्यवाद देण्यात येत आहेत.
दरम्यान, या गणेशघाट उद्घाटनप्रसंगी सरपंच पल्लवी देवघरे, सरपंच संतोष ठोंबरे, उपसरपंच अनंता पाटील, उपसरपंच सारिका लाड, ग्रामसेवक प्रशांत कदम, ग्रामसेवक नलावडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version