। अलिबाग । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील करंजाडे नवीन वसाहतीमध्ये बुधवार (19) पनवेल महानगरपालिकेचे विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक गणेश कडू, करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे, उपसरपंच योगेंद्र कैकाडी, संतोष आंग्रे, मंगेश बोरकर, निलिमा भगत, योगेश फापाळे, शैलेश चव्हाण, शुभम चाळके, अमित यादव, विनायक पोपट, जीवन चाळके, श्रीकांत पाटील, शे.का.प.कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या महोत्सवाचे आयोजन चार वर्षांपासून करंजाडे शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास मंडळातर्फे केले जाते.यावेळी श्रीकांत पाटील यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महोत्वामध्ये विविध प्रकारचे खेळ, खाऊ, कपडे, खेळणीची दुकाने थाटलेली आहेत.नागरीकांनी महोत्सवाचा आनंद लुटण्याचे आवाहन आयोजकांनी केला आहे.