खोपोली महोत्सवाचे उद्घाटन

। खोपोली । प्रतिनिधी ।

लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना चालना देण्यासाठी खोपोली महोत्सवाचा भव्य उद्घाटन सोहळा जयंत धोटे आणि गीता धोटे या उभयतांच्या हस्ते संपन्न झाला.

लायन्स क्लब ऑफ खोपोली तर्फे प.पू. गगनगिरी महाराज आश्रम येथे किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांसाठी डायलिसिस सेंटर, डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर तसेच इतर आजारांवर मोफत इलाज केला जातो. त्याचसोबत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. या सर्व उपक्रमांसाठी निधी उभारणीकरिता तसेच स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच, खोपोली महोत्सवाच्या भव्य उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी हजारो खोपोलीकरांनी आयोजनास भरभरून प्रतिसाद दिला. या आयोजनात विविध कर्मणुकीचे कार्यक्रम, फटाक्यांची आतिषबाजी आणि बक्षीसांची लयलूट करण्यात आली.

Exit mobile version