हुतात्मा सैनिकांच्या स्मृतिस्थळाचे लोकार्पण

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद जवान स्मारकामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व 66 शूर हुतात्मा सैनिकांची नावे असलेले स्मृतिस्थळ लोकार्पण सोहळा उत्साहात झाला. लेफ्टनंट जनरल डॉ. निंभोरकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन व मानवंदना देऊन स्मृतिस्थळाचे लोकार्पण केले.

लोकार्पण सोहळ्याला निवृत्त लेफ्टनंट जनरल विश्‍वास भट, बालाकोट एअर स्ट्राइकचे रचनाकार निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. राजेंद्र निंभोरकर, निवृत्त कॅप्टन यशवंत कदम, वीर पत्नी सुनंदा महाडिक, माजी सैनिक अमर चाळके, सदानंद भागवत, कृष्णकुमार भोसले आणि शिरीष फाटक उपस्थित होते.

Exit mobile version