प्रशांत नाईक मित्रमंडळ संचालित रूग्णवाहिकेचे लोकार्पण

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग संचालित नविन रूग्णवाहिकेचे लोकार्पण अलिबाग को.ॲा. अर्बन बैंक चेअरमन सुप्रियाताई पाटील, माजी राजिप सदस्या भावनाताई पाटील ह्यांच्या हस्ते व माजी आमदार पंडीतशेठ पाटील आणि माजी नगराध्यक्ष प्रशांत मधुसूदन नाईक यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले.


यावेळी माजी राजिप सदस्या चित्रा पाटील, माजी उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, माजी राजिप सदस्या सौ. प्रियदर्शनी पाटील, चेंढरे सरपंच स्वाती पाटील, पीएनपी एज्युकेशनच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, माजी गटनेते प्रदीप नाईक, नगरसेवक वृषाली ठोसर, अश्विनी पाटील, सौ. संजना किर, सौ. प्रिया घरत, श्री. संदीप घरत तसेच प्रशांत नाईक मित्र मंडाळाचे सदस्य उपस्थित होते.


सदर रूग्णवाहिका अलिबाग तालुक्यात महिला रूग्णांना ने- आण करण्यासाठी मोफत असेल. तसेच रूग्णांना अधिक उपचारासाठी अलिबाग बाहेर किंवा इतर ठिकाणी नेहण्यासाठी इंधन खर्चात उपलब्ध होईल, असे प्रशांत नाईक यांच्या वतीने आले.

Exit mobile version