। पनवेल । वार्ताहर ।
उलवे येथील इंडियन मॉडेल स्कूल व सिद्धांत रायफल व पिस्तूल शुटिंग क्लब रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने चालू केलेल्या रायफल क्लबचे उद्घाटन पोलीस उपायुक्त परिमंडल 2 चे शिवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला स्कुल व ज्युनिअर कॉलेजचे डायरेक्टर विकास कोळी, ज्युनिअर कॉलेजच्या प्रिंसिपल डॉ. गौरी शाह, स्कुलच्या प्रिंसिपल वृषाली पराडकर, मास इन्फ्रास्ट्र करचे एमडी महमुद काझी, महाराष्ट्र रायफल संघटनेचे असिस्टंट सेक्रेटरी अनिल रासकर, आयएसएसएफ जज जयंत साळवे, आयएसएसएफ सर्टिफाईड कोच हरेश कांबळे न्यू इंग्लीश स्कुलचे चेअरमन शरद खारकर ब सिद्धांत रायफल व पिस्तूल शूटिंग क्लबचे सेक्रेटरी रायगड भूषण राष्ट्रीय नेमबाज किसन खारके, अध्यक्ष विजय खारकर व प्रशिक्षक राष्ट्रीय नेमबाज अलंकार कोळी स्कुलचे सर्व शिक्षक व मुले त्यांचे पालक नेमबाजीवर आवड असणारा मित्रपरिवार उपस्थित होते.