खांबवली येथे रस्ता, स्मशानभूमीचे लोकार्पण

| तळा | वार्ताहर |
तळा तालुकातील मौजे खांबवली येथे शिवसेना शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या हस्ते रस्ता,स्मशानभूमी शेड व वॉल कंपाऊंडचे लोकार्पण करण्यात आले. खांबवली येथे आ.भरत गोगावले यांच्या माध्यमातुन 15 लाख रुपये शेनाटे गावाकडे जाणारा रस्ता डांबरीकरण, 3 लाख स्मशानभूमी शेड दुरुस्ती, 3लाख अंगणवाडी वॉल कपाऊंड अशी 21 लाखांची विकासकामे करण्यात आली आहेत. या विकासकामांचा लोकार्पण सोहळा प्रमोद घोसाळकर, निलीमा घोसाळकर, विपुल उभारे त, प्रद्युम्न ठसाळ, लिलाधर खातु, राकेश वडके सर्व नगरसेवक व पदाधिकारी तसेच खांबवली ग्रामस्थ इ यांच्या उपस्थिती पार पडला.

Exit mobile version