विज्ञान प्रयोग शाळेचे उद्घाटन

। उरण । वार्ताहर ।

नुकताच जनता विद्यामंदिर व ज्युनि.कॉलेज अजिवली येथे इन्फिनियम इंडिया ऑडिटिव्हज प्रा.लि.कं यांच्यावतीने विद्यार्थ्यांची गरज ओळखून भव्य, सुसज्ज आणि अद्ययावत अशा विज्ञान प्रयोगशाळेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी एस.के. रघुराम, हर्षद जांभवलेकर, मोहनीज शुक्ला, गिरिराज धिंग्रा, डॉ.राखी धिंग्रा, गुलाब सुर्यवंशी तसेच प्रकाश हाके, बेडगे, एस.एच.पाटील, डी.बी चवरे, परशुराम माळी, सुनील पवार, रघुनाथ पाटील, गोविंद पाटील, कान्हा कडव, विलास गायकर आदींसह शिक्षक वृंद व विध्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version