शिव सई आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन

| उरण | वार्ताहर |
उरण चारफाटाजवळ शिव सई आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन महसूल नायब तहसीलदार उरण नरेश पेढवी यांच्या हस्ते मंगळवार (दि. 4) रोजी झाले. शिव सई आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक स्वाती म्हात्रे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. शिव सई आपले सरकार सेवा केंद्रामध्ये सर्व प्रकारचे दाखले मिळतील, त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महसूल नायब तहसीलदार नरेश पेढवी यांनी उद्घाटनप्रसंगी केले. याप्रसंगी महसूल नायब तहसीलदार उरण नरेश पेढवी, तहसील कार्यालयातील शिवनाथ गिरी, कुंजल पाटील, स्वाती म्हात्रे आदी उपस्थित होते.

Exit mobile version