आक्षीतील अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

चित्रलेखा पाटील यांचा पुढाकार

| अलिबाग | शहर प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील आक्षी ग्रामपंचायत हद्दीत शेकापच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आक्षी-खारगल्ली या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. याआधी या रस्त्याचा भूमीपूजन सोहळा शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते पार पडला होता. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे स्थानिकांमधून शेकापचे आभार मानले जात आहेत.


अलिबाग तालुक्यातील आक्षी ग्रामपंचायत हद्दीत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आणि राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे आक्षी ग्रामपंचायत हद्दीतील गावांच्या विकासाला अधिक गती मिळाली आहे. दरम्यान, आक्षी येथील काळंबा देवी मंदिरासमोरील खारगल्ली रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. स्थानिक शेकाप कार्यकर्त्यांनी ही बाब चित्रलेखा पाटील यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी पुढाकार घेतला. या रस्त्याचा भूमीपूजन सोहळा एप्रिल महिन्यात चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते पार पडला होता. त्यानंतर रविवारी (दि.21) आक्षी-खारगल्ली या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आक्षी ग्रामपंचायतीच्या सरपंच रश्मी पाटील, सदस्य रश्मी वाळंज, निरजा नाईक, कुंजल पाटील, शेकाप कार्यकर्ते रवींद्र पाटील, रश्मिन गुरव, संतोष कवळे, रमेश केणी, अभिजीत वाळंज, संतोष राऊळ, अनिल म्हात्रे, प्रणित गुरव, गणेश म्हात्रे, सूरज गुरव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version