| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील धुतूम ग्रामपंचायत सध्या विकासकामांच्या वेगवान प्रगतीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. जिल्हा परिषद शाळेतील अत्याधुनिक संगणक कक्ष, गावातील पिण्याच्या पाण्यासाठी नवीन पाईपलाईन आणि ग्रामपंचायतीच्या महिला बचतगटासाठी अत्याधुनिक कापडी पिशवी निर्मिती मशीन या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत आणि उद्योजक पी.जी. ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला गटशिक्षण अधिकारी निर्मला घरत, अल्ट्राटेकचे रामकृष्ण घायल, इंडियन ऑईल अदानी व्हेंचरच्या नाझनीन शेख, सतीश म्हात्रे, संदीप काळे, प्रफुल्ल म्हात्रे, सी-बर्डचे वैभव कदम, सरपंच सुचिता ठाकूर, उपसरपंच सुचिता कडू, सदस्य स्मिता ठाकूर, कविता पाटील, करिष्मा ठाकूर, अनिता ठाकूर, रविनाथ ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, प्रकाश ठाकूर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धुतूममध्ये तीन प्रकल्पांचे लोकार्पण
