नवीन पनवेलमध्ये विविध कामांचे उद्घाटन

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल महापालिकेच्या नगरसेविका अरुणा किरण दाभणे यांच्या प्रयत्नांतून व सततच्या पाठपुराव्याने पाले खुर्द, देवीचा पाडा व ढोंगर्‍याचा पाडा या गावांमध्ये आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला.
पाले खुर्द व देवीचा पाडा येथे लावलेल्या हायमास्ट पोलांचे लोकार्पण, गावदेवी तलावाभोवती बांधलेल्या संरक्षण भिंतीचे लोकार्पण, बौद्ध स्मशानभूमीचे सुशोभीकरण, पाले खुर्द गावातील रस्त्याचे डांबरीकरण व आरसीसी गटार बांधणे, वाचनालय बांधणे या कामांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगरसेवक गणेश कडू, अरविंद म्हात्रे, नगरसेवक विष्णू जोशी, शंकर म्हात्रे, कामगार नेते प्रकाश म्हात्रे, आरडीसी बँकेचे संचालक गणपत देशेकर, किरण दाभणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version