ऑलिम्पिकमध्ये नवीन खेळांचा समावेश

। पॅरीस । वृत्तसंस्था ।

जगातील सर्वात मोठा खेळाचा महाकुंभ म्हणजे ऑलिम्पिक! या ऑलिम्पिकला 1896 मध्ये सुरुवात झाली असून 26 जुलैपासून 33वे उन्हाळी ऑलिम्पिक खेळले जाणार आहे. पॅरिसमध्ये होणार्‍या या ऑलिम्पिकमध्ये अनेक नवीन गोष्टींसोबत नवे खेळ पाहायला मिळणार आहेत. या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी पॅरिसने 10 वर्षांपूर्वीच तयारी सुरू केली होती. यावेळी 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चार नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी ‘ब्रेक डान्सिंग’ ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच स्केट बोर्डिंग, सर्फिंग आणि स्पोर्ट्स क्लाइंबिंगचाही ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. याशिवाय यावेळी कराटे, बेसबॉल आणि सॉफ्टबॉल हे खेळ ऑलिम्पिकचा भाग नसतील. हे खेळ टोकियो ऑलिम्पिकचा भाग होते. मात्र, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांना जागा मिळालेली नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या चार नवीन खेळांसाठी एकही भारतीय खेळाडू पात्र ठरलेला नाही.

Exit mobile version