दिवा-सावंतवाडी रेल्वे थांबत नसल्यामुळे गैरसोय

लोकल रेल्वे सुरु करण्याची मागणी

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।

कोकण रेल्वेला उडदवणे येथून सुरुवात झाली असली तरी या कोकण रेल्वेचे पहिले रेल्वे स्टेशन कोलाड येथे आहे. परंतु, येथे दिवा-सावंतवाडी रेल्व थांबत नसल्यामुळे या परिसरातील जनतेकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोलाड परिसरात वाडया वस्त्या मिळून 65 ते 70 गावे असुन या परिसराचा दिवसेंदिवस झपाट्याने विकास होत आहे. तसेच, आजूबाजूला असणारे पर्यटन स्थळे यामुळे या परिसरात मुंबई, पुणे, ठाणे व इतर ठिकाणाहून असंख्य पर्यटक ये-जा करीत असतात. शिवाय गोवे-कोलाड येथे तटकरे पॉलीटेक्निकल, खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालय असुन येथे विविध भागातील विद्यार्थी या कॉलेजला येत असताता.

परंतु, कोलाड रेल्वे स्टेशनला फक्त रत्नागिरी पॅसेंजर हि एकमेव गाडी थांबते. दुसरी सुरु असणारी दिवा-सावंतवाडीला थांबा नसल्यामुळे या मागावरून प्रवास करणार्‍या प्रवाश्यांची तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तसेच, रोहा तालुक्यासह सहा तालुक्यातील मुंबई-ठाण्याकडे नोकरीनिमित्त जाणारी लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे वीर ते पनवेल लोकल रेल्वे सुरु केल्याने मुंबई-ठाणे येथे जाऊन येथील विद्यार्थी व महिला आपले कुटुंब सांभाळून पार्ट टाइम नोकरी करू शकतील. यामुळे आर्थिक फायदा होईल. याचबरोबर परिसरातील व्यावसाय वाढतील. यामुळे पनवेल ते वीर लोकल रेल्वे सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Exit mobile version