। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारतात धोक्याची घंटा! भारतामध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणू पसरताना दिसत आहे. नागरीकांनी काळजी घेण्याची गरज आहे. कारण भारतामध्ये एकाच दिवशी 1 हजार 549 कोरोना रूग्णाची नोंद झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्युची संख्या आतापर्यत 5 लाख 16 हजार 510 वर पोहचली आहे तसेच 24 तासात एकुण 3 लाख 84 हजार 499 कोरोना चाचण्या झाले आहे.
भारतातील कोरोना रूग्णांची संख्या 7 ऑगस्ट 2020 रोजी 20 लाख, 23 ऑगस्ट रोजी 30 लाख, 5 सप्टेंबर रोजी 40 लाख आणि 16 सप्टेंबर रोजी 50 लाखांवर गेली होती. 28 सप्टेंबर रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर रोजी 70 लाखांवर गेली होती. 29 ऑक्टोबर रोजी 80 लाख, 20 नोव्हेंबर रोजी 90 लाख आणि 19 डिसेंबर रोजी एक कोटींचा होती. भारताने गेल्या 4 मे रोजी 2 कोटी आणि 23 जून रोजी 3 कोटींचा कोरोनाचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. सार्वजनिक कार्यक्रम, लग्न, धार्मिक कार्यक्रम यांना देखील आता परवानगी देण्यात आली आहे. मात्र, झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या यामुळे धोका निर्माण झाला आहे.
