| पुणे | प्रतिनिधी |
रोजच्या आहारातील जीवनावश्यक वस्तूंपैकी एक असलेले गाय आणि म्हशीच्या दुधात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाने घेतला असल्याचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी सांगितले. नवे दर 15 मार्चपासून लागू करण्यात आल्याचे म्हस्के म्हणाले. त्यानुसार गायीच्या दूध प्रतिलीटर 56 रुपयांहून 58 रुपये, तर म्हशीचे दूध प्रतिलीटर 72 रुपयांहून 74 रुपये होणार आहे.