दररोज दवाखाने, प्रयोगशाळा, रुग्णालयांतून 240 किलो जैविक कचरा
। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील शहर, ग्रामीण भागात असलेल्या दवाखाना, रुग्णालये, प्रयोगशाळा यांच्या संख्येमुळे यामध्ये दररोज जमा होणारा सुमारे 250 किलो जैविक कचर्याची (बायो मेडिकल वेस्ट) विल्हेवाट लावण्याचे काम दिवसेंदिवस खर्चिक होऊ लागले आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उरण तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागात सुमारे 100 हून अधिक खासगी दवाखाने, 15 हॉस्पिटल, 6 लॅबोरेटरी कार्यरत आहेत. यामध्ये 30 खाटांचे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, कोप्रोली येथील शासकीय आरोग्य केंद्राचा समावेश आहे.
दररोज रुग्णालयात करण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय सामुग्री यामुळे उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दररोज 7-8 किलो तर कोप्रोली आरोग्य केंद्रात 2-3 किलो जैव वैद्यकीय कचरा जमा होतो. तर शासकीय रुग्णालय, आरोग्य केंद्र वगळता तालुक्यात शहर व ग्रामीण भागात 100 हून अधिक दवाखाने, 15 हॉस्पिटल, 6 लॅबोरेटरी कार्यरत आहेत. यामध्येही दररोज 225 ते 240 किलो ‘बायो वेस्ट’ जमा होतो. त्यामुळे दररोज शहर व ग्रामीण भागातील दवाखाने, हॉस्पिटल, प्रयोगशाळा मिळून 250 किलो जमा होणार्या जैविक कचर्याची विल्हेवाट लावणे सर्वासाठी अत्यंत जिकिरीचे काम पार पाडावे लागते.
दररोज जमा होणारा जैविक कचरा कचराकुंडया, अथवा नको त्या ठिकाणी उघडयावर टाकून देणे नागरिकांच्या आरोग्यासाठी घातकच आहे. त्याशिवाय असा जैविक कचरा योग्य प्रकारे विल्हेवाट न लावताच टाकणे धोकादायक आहे. त्यामुळे शासनानेच दररोज जमा होणारा जैविक कचर्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय अथवा खासगी रुग्णालय, हॉस्पिटल्स जैविक कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी हयगय करताना फारसे आढळून येत नाहीत. त्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करून लाल, पिवळया, हिरव्या रंगाच्या बकेटमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येते. त्यानंतर जैविक कचरा पैसे मोजून ठेकेदारी पध्दतीवर नियुक्त केलेल्या खासगी अथवा शासकीय एजन्सीमार्फत जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यात येते. मात्र काही खासगी हॉस्पिटल पैसे वाचविण्यासाठी जमा होणारा जैविक कचरा अंधाराचा फायदा घेऊन उघडयावरच टाकून देत आहेत.
कोट
जैविक कचरा दररोज वाहून नेण्यासाठी प्रत्येक खाटेसाठी दिवसाकाठी दहा रुपये तर 10 खाटांसाठी वर्षांकाठी 30 हजार रुपये खासगी एजन्सीला मोजावे लागत असल्याचे उरण मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकार्यांकडून सांगितले जात आहे. येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दररोज 7 ते 8 किलो पर्यंतच जैविक कचरा जम
-डॉ. गौतम देसाई
