पीएनपी संकुलात स्वातंत्र्य दिन साजरा

| अलिबाग | प्रतिनिधी |

पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या वेश्वि संकुलात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच, जिल्ह्यातील पीएनपीच्या सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समारंभाच्यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्याविष्काराचे सादरीकरण केले.

याप्रसंगी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य रविंद्र पाटील, होली चाईल्ड सीबीएसई स्कूलच्या मुख्याध्यापिका वेणी वेल्लईम्मल्ल, होली चाईल्ड स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, बीएडच्या प्राचार्या डॉ. वैशाली रगडे, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, इंग्रजी माध्यम ॲकॅडमिक को ओर्डीनेटर श्रुती सुतार, मुख्य कार्यालयाच्या मनिषा रेलकर, संकुलातील शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version