चिरनेर | वार्ताहर |
चिरनेर ग्रामपंचायत कार्यालयात स्थानिक नागरिकांना सुलभ व जलद सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रत्येक कामकाजाचे स्वतंत्र असे विभाग पाडण्यात आले आहेत. या स्वतंत्र कक्षामुळे नागरिकांना आता सेवा सुविधा सुलभ व जलद होणार आहेत.
या आधुनिक पद्धतीच्या चिरनेर ग्रामपंचायत कार्यालयाचा शुभारंभ राजिप सदस्य बाजीराव परदेशी, उरण पंचायत समितीच्या सभापती शुभांगी पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. ग्रामपंचायत निधीतून हे कामकाज करण्यात आले आहे. यावेळी सरपंच संतोष चिर्लेकर, उपसरपंच प्रियांका गोंधळी, ग्रामविकास अधिकारी महेश पवार, सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी, ग्रामपंचायत सदस्या शीतल घबाडी, संध्या ठाकूर, सदस्य धनेश ठाकूर, धर्मेंद्र म्हात्रे, रमेश फोफरकर, किरण कुंभार, सविता केणी तसेच अन्य सदस्य उपस्थित होते.