आ. जयंत पाटील, अनंत गीते करणार मार्गदर्शन
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीमधील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा अलिबागमध्ये होणार आहे. अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहामध्ये हा मेळावा शुक्रवार, (दि. 15) मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास होणार आहे. यावेळी शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील, शिवसेना नेते अनंत गीते यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील यांनी दिली. यावेळी काँग्रेसचे महेंद्र घरत, ॲड. प्रवीण ठाकूर, नंदा म्हात्रे, चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश टोकरे, प्रशांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
रायगड लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीतील सर्व लोकसभा समन्वय, जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, विधानसभा संपर्क प्रमुख, तालुका संपर्क प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, रायगड जिल्हा परिषद गटातील दहा प्रमुख कार्यकर्ते, तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. आस्वाद पाटील यांनी केले आहे.
