इंडिया आघाडीच्या गाव बैठकांचा धडाका

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।

32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनंत गीते यांना निवडून आणण्यासाठी सुधागड तालुक्यातील इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.

सुधागड तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीतील कोशिबळे, नागशेत, नेनवली, पिपलोली, खडसाबळे, आतोने, कलबोशी, गोमाशी, फणसवाडी, वावलोली, सिद्धेश्‍वर येथे शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस, आय कॉग्रेस या इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते गाव, वाडी वस्त्यांवर गावोगावी प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार सभा घेऊन जोरदार प्रचार करत आहेत. अनंत गीते यांच्यावर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही, स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला बहुसंख्य मतांनी निवडून विजयी करा, असे कार्यकर्ते मतदारांना आवाहन करत आहेत.

Exit mobile version