• Login
Sunday, November 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रामलीलावरून ‌‘इंडिया‌’चा एल्गार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 1, 2026
in sliderhome, नवी दिल्ली, राजकीय
0 0
0
रामलीलावरून ‌‘इंडिया‌’चा एल्गार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याची मागणी

| नवी दिल्ली | प्रतिनिधी |

मतांची चोरी, ईव्हीएममधील कथित घोटाळे आणि मतदार याद्यांतील फेरफारावरून इंडिया आघाडीने केंद्र सरकारविरोधात रणशिंग फुंकले. रविवारी (दि. 1) दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीतील 20 घटक पक्षांनी एकत्र येत महारॅलीतून मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाला थेट आव्हान दिले. ‌‘ज्ञानेश कुमार यांच्यामुळेच मोदी पंतप्रधान झाले,‌’ असा गंभीर आरोप करत राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याची मागणी केली. तर ममता बॅनर्जी, मल्लिकार्जुन खरगे, एम.ए. बेबी, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती आणि अखिलेश यादव यांनीही मतदारांच्या अधिकारांवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी करताना, ‌‘ज्ञानेश कुमार यांच्याशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते,‌’ असा गंभीर आरोप केला. देशाला दोन-तीन लोकांच्या मालकीचा बनवू देणार नाही, संविधान सर्वांत मोठे आहे आणि त्यापेक्षा कोणीही मोठे नाही, असा निर्धार व्यक्त करत विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली.

राहुल गांधी यांनी ईव्हीएम आणि मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकारांचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. देशाला पुन्हा योग्य मार्गावर आणण्याचे पहिले पाऊल म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवणे होय. त्यांना जावेच लागेल, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादीतून 13.5 कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली. प्रत्येक सात मतदारांमागे एका मतदाराचे नाव कमी झाले असून, देशातील 15 टक्के मतदारांची नावे हटवण्यात आली. लोकसभा निवडणुकीत एनडीए आणि विरोधकांच्या मतांमधील फरक अवघा तीन टक्के होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळण्यात आली. त्यामुळे 2024 ची निवडणूक बेकायदेशीर होती, असा दावा राहुल गांधी यांनी केला. मतदार याद्यांमधील कथित फेरफार ही साधी चोरी नसून देशद्रोह आहे. ज्ञानेश कुमार यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

देशातील शेतकरी कष्ट करत असेल तर त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले पाहिजे. विद्यार्थी 18 तास अभ्यास करत असेल तर त्याला रोजगार मिळाला पाहिजे, असा भारत आम्हाला हवा आहे. देश दोन-तीन लोकांच्या मालकीचा होऊ देणार नाही. आम्ही संविधान नष्ट होऊ देणार नाही, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

आम्हाला हरवण्यात आले : बॅनर्जी
पश्चिम बंगालमध्ये आमचा पराभव घडवून आणण्यात आला. आम्ही हरलो नाही, तर आम्हाला हरवण्यात आले. ईव्हीएम लुटले, मते लुटली आणि संविधानाचीही लूट केली, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी केला. दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या सभेत त्या बोलत होत्या. पश्चिम बंगाल हा ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या कथित संगनमताचा बळी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. एसआयआर प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करताना संविधानिक मूल्यांचे उल्लंघन होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण झाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
ज्ञानेश कुमारांना हटवणारच : खरगे
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना जमिनीत लपले असले, तरी बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा आक्रमक इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला. मोदी सरकारला सत्तेतून हटवण्यासाठी विरोधकांनी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान मोदी आपल्या मर्जीतील व्यक्तींना महत्त्वाच्या पदांवर बसवून जनतेच्या मताधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही एकत्र येऊन लढू, मोदींना हटवू आणि संविधानाचे रक्षण करू,‌’ असे ते म्हणाले. महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशातील सरकारांवरही टीका करत ही सरकारे जनतेच्या मतांवर निवडून आलेली नसून चोरीची सरकारे असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपच्या विदाईची वेळ आलेय : यादव
उत्तर प्रदेशात एक कोटी 27 लाख मतदारांची नावे कमी झाल्याच्या मुद्द्यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपला लक्ष्य केले. सव्वा कोटी मतदारांची संख्या राज्यातील 403 विधानसभा मतदारसंघांत विभागली, तर प्रत्येक मतदारसंघातील सुमारे 31 हजार मते कमी झाल्याचे चित्र समोर येते, असे ते म्हणाले. निवडणुकीतील पराभव दिसू लागल्यानंतर भाजपकडून मतदारांची नावे कमी झाल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. भाजपला केवळ त्यांच्याच पक्षाचे सदस्य मतदार म्हणून हवे आहेत, असा आरोप त्यांनी केला. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांमध्ये मतदारांना धमकावण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीत भाजपची थोडी विदाई झाली असून, आगामी काळात आणखी विदाई होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newspolitical newssocial news
Previous Post

महासत्तांना 72 तासांचा हाय अलर्ट

Next Post

दिवाळीनिमित्त बच्चेकंपनीकडून किल्ले उभारणीची लगबग

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

महासत्तांना 72 तासांचा हाय अलर्ट
sliderhome

महासत्तांना 72 तासांचा हाय अलर्ट

November 1, 2026
सोमवारी कर्जत तालुका बंद ठेवा
sliderhome

सोमवारी कर्जत तालुका बंद ठेवा

November 1, 2026
sliderhome

तडीपार गुन्हेगाराकडून गांजा विक्री

November 1, 2026
रेवदंड्यात मटका अड्ड्यावर धाड; दोघांवर गुन्हा दाखल
sliderhome

पाटणसई येथील मटका अड्ड्यावर छापा

November 1, 2026
sliderhome

सरकारी कार्यालयांकडून मालमत्ता कर थकीत

November 1, 2026
sliderhome

पाच कोटींच्या जमिनीसाठी तोतयांचा डाव

November 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?