। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत. दुबईत होणाऱ्या या महामुकाबल्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत आणि मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. पाकिस्ताने जिंकला टॉस जिंकला असून ते आधी फलंदाजी करणार आहेत.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी.
पाकिस्तान संघ : इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक/कर्णधार), सलमान आघा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद.