भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ

तिकीटाचे दर तिप्पट महागडे

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

टी-20 विश्वचषकाला आता फक्त दोन आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. 2 जूनपासून टी-20 विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. 29 जूनपर्यंत क्रिकेटचा महासंग्राम सुरु राहणार आहे. यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदाच 20 संघाचा सहभाग असणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरोधात होणार असून भारत आणि पाकिस्तानच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

विश्वचषकतात भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये 9 जून रोजी आमना-सामना होणार आहे. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या या सामन्याची तिकटे लाखो-करोडोमध्ये विकली जात आहेत. चाहत्यांमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या लढतीकडे लक्ष असणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे संघ फक्त आयसीसी स्पर्धेतच एकमेंकाविरोधात खेळतात. त्यामुळे या सामन्याची क्रेझ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 9 जून रोजी होणाऱ्या तिकिटांची किंमत लाखोंमध्ये असल्याचे समोर आले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामना न्यूयॉर्कच्या नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. वानखेडे स्टेडियमइतकीच याची प्रेक्षक क्षमता आहे. या सामन्याचे सर्वात स्वस्त तिकिट यूएस करेन्सीनुसार 2500 डॉलर इतकी असल्याचे समोर येत आहे. भारतीय रुपायत याची किंमत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. जर एकाच कुटुंबातील चार जण सामना पाहायला गेले तर त्यांना 10 हजार डॉलर रुपये मोजावे लागतील. म्हणजे, त्यांना तब्बल 8.4 लाख रुपयांचे तिकिटे खरेदी करावी लागतील. पाकिस्तानच्या व्यक्तीला एका तिकिटासाठी त्यांच्या करेन्सीमध्ये 7 लाख रुपये मोजावे लागतील. तसेच, सर्वात महागडे तिकिट 1.86 कोटी रुपये इतके आहे. याआधी वनडे विश्वचषकाच्या सामन्यातील सर्वात महागडे तिकिट 57 लाख रुपये इतके होते. म्हणजे, अमेरिकेत हे तिकिट तिप्पट महागडे आहे.

Exit mobile version